अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत असते. तिचा शेवटचा ‘दगडी चाळ’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिचं एक गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये पूजा अभिनेता वैभव तत्त्ववादीबरोबर दिसली. प्रेक्षकांचाही या गाण्याला बराच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अभिनेता भूषण प्रधानबरोबर तिने दिवाळीनिमित्त एक जाहिरात केली. यादरम्यान तिच्या रिलेशनशिपबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या.

आणखी वाचा – करीनाचा लेक जमिनीवर लोळला तर आलियाने लपवलं बेबी बंप, कपूर कुटुंबियांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का?

त्याचं झालं असं की, पूजा व वैभवने ‘चल अब वहाँ’ या आपल्या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं. हे फोटोशूट पाहून तुमची जोडी परफेक्ट आहे, तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का?, यंदा कर्तव्य आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. तर भूषण प्रधानबरोबर जाहिरात केल्यानंतरही असंच काहीसं घडलं.

भूषणबरोबरच्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्याशी पूजाचं नाव जोडलं. तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता, तुमची जोडी सुंदर आहे अशा कमेंट येऊ लागल्या. या सगळ्या कमेंटना पूजाने एक पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे. खरं तर वैभव-भूषण दोघंही तिचे जवळचे मित्र आहेत. याचबाबत आता तिनेही खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरेचं घर तुम्ही पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती म्हणाली, “ही काही मैत्रीदिनाची पोस्ट नाही. पण खऱ्या मित्रासारखं तुम्ही दोघंही माझ्या पाठिशी खंबीर उभे राहिलात त्यासाठी धन्यवाद. आपण एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. यादरम्यान अनेक चढ-उतार आले. काही चांगल्या तर काही वाईट आठवणीही आहेत. काहीही झालं तरी एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार हे आपल्याला माहित आहे. तुमच्या दोघांबरोबरही स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली त्याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते. हे आतापर्यंतचं सगळ्यात बेस्ट दिवाळी गिफ्ट आहे.” पूजाची ही पोस्ट पाहता ती कोणत्याच अभिनेत्याला डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.