scorecardresearch

Premium

ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्राजक्ता गायकवाड दिसणार हटके अंदाजात, म्हणाली…

प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी ‘सिंगल’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

Praajakta

ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी ‘सिंगल’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे. २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन चावडा आणि सागर पाठक यांनी केले आहे.

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
yavatmal aarchi tigress marathi news, tipeshwar wildlife sanctuary marathi news, aarchi tigress yavatmal marathi news
VIDEO : ‘आर्ची’ कुटुंबकबिल्यासह दिसताच पर्यटक सैराट, टिपेश्वरच्या जंगलात झिंग झिंग झिंगाट!!!
Prabhavalkar Rohini Hattangadi
अनंत महादेवन यांच्या चित्रपटाची घोषणा

आपल्या भूमिकेविषयी बोलताना प्राजक्ता सांगते, ‘कॉलेजकट्टा त्यातली धमाल असा हा चित्रपट आहे. मी आजवर कॉलेजगोईंग भूमिका साकारली नव्हती. अतिशय साधीसरळ मुलगी मी यात साकारली असून, ‘सिंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या जॉनरची भूमिका करायला मिळाल्याचा आनंद आहे. प्रथमेश परब आणि अभिनय बेर्डे या सहकलाकारांसोबत मी पहिल्यांदाच काम केलं असून या चित्रपटात आम्ही ‘फुल ऑन कल्ला’ केला आहे. मी चित्रपटात ‘सिंगल’ राहणार की ‘मिंगल’ हे बघणं प्रेक्षकांसाठी धमाल अनुभव असणार आहे.

हेही वाचा : “तू लग्न कधी करत आहेस?” अखेर प्राजक्ता गायकवाडने दिलं उत्तर, म्हणाली…

किरण काशिनाथ कुमावत, हर्षवर्धन गायकवाड, शरद पाटील, अमोल कागणे, गौरी सागर पाठक हे ‘सिंगल’ या चित्रपटाचे निर्माते असून सह-निर्माते सुमित कदम आहेत. चित्रपटाचं लेखन सतीश समुद्रे यांचे असून पटकथा चेतन चावडा, सागर पाठक आणि सतीश समुद्रे यांची आहे. अभिजीत कवठाळकर, मोहित कुलकर्णी यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress prajakta gaikwad will be playing different role in single film rnv

First published on: 05-10-2023 at 18:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×