मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकार गेल्या काही दिवसांत सामाजिक, कला, राजकीय अशा विविध विषयांवर व्यक्त होत असल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केलेली अशीच एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्या कामातून वेळात वेळ काढून ती अनेकदा सामाजिक संस्थांना भेट देत असते.

प्राजक्ता माळीने नुकतीच विरारमधील एका बालिकाश्रमाला भेट दिली होती. याच पार्श्वभूमीवर समाजातील सध्याची परिस्थिती, मुलींचा सांभाळ याबाबत अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil,
शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

हेही वाचा : हिरवी साडी, नाकात नथ अन्…; पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो आला समोर

प्राजक्ता माळी लिहिते, “२ दिवसांपूर्वी Netflix वर ‘भक्षक’ सिनेमा बघत होते आणि त्याच संध्याकाळी या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला…कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होतोय बघून बरं वाटलं.”

“सजगपणे पहा, तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील या बालिकाश्रमाचा पर्याय तर खुलाच आहे. राहणं, जेवण, शिक्षण, आरोग्यसुविधा मोफत आहे. यासाठी काही नियम व अटी लागू असतील अशी पोस्ट शेअर करत प्राजक्ताने सामान्य नागरिकांना व तिच्या चाहत्यांना ‘भक्षक’ या सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा : “२०१४ पासून फक्त दोन वेळा…”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला किस्सा; पत्नी व लेकीबद्दल म्हणाले, “आम्ही तिघेही…”

“भक्षक जरूर पहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचंय हे ध्यानात येईल. सिनेमा, सिनेमा म्हणूनही उत्तमच झालाय.” असं प्राजक्ताने या पोस्टद्वारे सांगितलं. या चित्रपटाचं कथानक लहान मुलींवर आश्रमात होत असलेल्या अत्याचारावर आधारित आहे. तसेच मुख्य नायिका या मुलींची कशी सुटका करते? यादरम्यान तिच्या कुटुंबीयांना होणारा त्रास या सगळ्या गोष्टी ‘भक्षक’मध्ये पाहायला मिळतात. यामध्ये सई ताम्हणकरने महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.