अभिनेत्री सायली संजीव मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. ती अनेक जातीच्या आयुष्यातील गोष्टींबाबत मोकळेपणाने भाष्य करताना दिसते. तर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचं आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे असं सांगितलं आहे.

आता सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. अनेक कलाकारही त्यांच्या घरच्या गणपतीच्या तयारीला लागले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सायली संजीव. त्यांच्या घरी ती स्वतः गणपती बसवते. याबाबत तिने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “गणपती बाप्पा आणि माझं नातं मैत्रीचं आहेच पण त्याबरोबरच भावडांचं आहे. आमच्या घरी सात दिवसांचा गणपती असतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहेत. आमच्या गौरीही असतात. आमच्याकडे १५० वर्षे जुने गौरींचे मुखवटे आहेत.”

हेही वाचा : ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध! सायली संजीव नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुम्हा दोघांसाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “आठ वर्षांपूर्वी मी स्वत: बाप्पा बसवायला लागले आणि ही माझ्यासाठी कायम आठवणीत राहणारी गोष्ट आहे. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मुली गणपती बसवत नाही, असं आपल्याकडे म्हणतात. पण मी नऊवारी साडी आणि साजश्रृंगार करुन बाप्पा बसवते. बाप्पा कायम माझ्या सोबतच असं, माझ्या पाठीशी आहे असंच मला वाटतं. वडिलांच्या आजारपणात बाप्पाकडून खूप सकारात्मक उर्जा मिळाली असं वाटतं.”