फ्रेंडशिप डेनिमित्तानं कलाकार मंडळी आज आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आहेत. फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करून जीवलग मित्र-मैत्रिणींबरोबरचे काही खास किस्से लिहीत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील एका जवळच्या मैत्रिणीबरोबरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णीनं याआधी फ्रेंडशिप डेनिमित्ताने सई ताम्हणकर व प्रार्थना बेहेरेचा एक व्हिडीओ शेअर केला होता; ज्यामध्ये सई व प्रार्थना ‘अजीब दास्तां है’ हे गाणं गाताना पाहायला मिळाल्या होत्या. सोनालीनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं की, “याला म्हणतात खूप जवळची मैत्री…या अशा वागणार आणि माझा अपमान करणार. देव करो अन् सर्वांना यांच्यासारखे मित्र मिळो!”

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: मनीषा रानीला टार्गेट केल्यामुळे वडील प्रमोद कुमार यांनी सलमान खानविषयी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

त्यानंतर आता सोनालीनं तिच्या अजून एका जवळच्या मैत्रिणीबरोबर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. सोनालीची ही खास मैत्रिणी म्हणजे लोकप्रिय नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर. या डान्स व्हिडीओत दोघी वाळवंटात नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सोनालीनं लिहिलं आहे की, “हर एक फ्रेंड जरूरी होता है. अशी मैत्रीण जिच्याबरोबर मी मनापासून नाचू शकते.”

हेही वाचा – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सिंधुताई माझी माई’मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत

हेही वाचा – AI ने तयार केला महेश मांजरेकरांचा जबरदस्त लूक; स्वतःचाच फोटो पाहून म्हणाले, “माझी इच्छा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली व फुलवाच्या या डान्स व्हिडीओवर सईनं कमेंट केली आहे. ती म्हणाली की, “आज फ्रेंडशिप डे आहे? हॅपी फ्रेंडशिप डे चिऊ. आय लव्ह यू.” सईच्या या कमेंटवर सोनालीनं लिहिलं आहे की, “हम्म. भारतात आहे. पण आपली मैत्री तर आंतरराष्ट्रीय आहे ना. आय लव्ह यू टू चिबू.”