‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल सुरू आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट अनेक रेकॉर्डस मोडत आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आणि त्या स्क्रीनिंगला सचिन तेंडुलकरने त्याच्या पत्नीबरोबर हजेरी लावत हा चित्रपट पाहिला.

आतापर्यंत या चित्रपटाने ७० हून अधिक कोटींची कमाई केली. प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनी देखील या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकरने नुकताच हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट त्याला खूप आवडल्याचंही त्याने ट्वीट करत म्हटलं. यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली. त्यादरम्यानचा त्यांचा एक फोटो शेअर करत सुकन्या मोने यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’मध्ये अंकुश चौधरीच्या पत्नीने घातलेल्या ब्रेसलेटमागे दडलाय मोठा अर्थ, ‘असा’ तयार झाला लूक

मुंबईत या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या चित्रपटाची टीमही या स्क्रीनिंगला हजर होती. या स्क्रीनिंगच्या वेळी सुकन्या मोने सचिन तेंडुलकरला भेटल्या. सचिन तेंडुलकरबरोबर काढलेला त्यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “काही बोलायची खरंतर गरजच नाहीये. पण माणूस म्हणून मला हे खूप आवडतात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “चित्रपटात सोहमबरोबर दिसणारी अभिनेत्री त्याची…”, अखेर केदार शिंदेंनी केला सुचित्रा-आदेश बांदेकरांच्या लेकाबद्दल खुलासा

आता त्यांची ही पोस्ट खूप व्हायरल होत असून त्यावर कमेंट करत त्यांचे चाहते याचबरोबर कलाक्षेत्रातील मंडळी त्यांची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.