रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. प्रेक्षक रितेश व जिनिलीयाच्या चित्रपटावर भरभरुन प्रेम करत आहेत.

आणखी वाचा – Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

‘वेड २’ येणार का?

‘वेड’ला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे रितेश भारावून गेला आहे. याचनिमित्त त्याने इन्टाग्राम लाइव्ह केलं होतं. यावेळी त्याने चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्याने उत्तरंही दिली. यावेळी ‘वेड’च्या दुसऱ्या भागाबाबतही रितेशला विचारण्यात आलं. तेव्हा त्याने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं.

“वेड चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार?” असं रितेशला एका चाहत्याने विचारलं. यावेळी रितेश म्हणाला, “सध्यातरी असा काहीच विचार नाही. ‘वेड’ चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत अजून विचार केलेला नाही.” तर दुसरीकडे प्रेक्षक ‘वेड’चा दुसरा भाग आला पाहिजे असं म्हणत आहेत.

आणखी वाचा – ‘वेड’ची कमाई पाहून भारावली रितेश देशमुखची वहिनी, म्हणाली, “४१ कोटी रुपयांचा…”

रितेशनी या चित्रपटाबाबत एक नवी घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच २० जानेवारीपासून ‘वेड’ चित्रपटाचं नवीन व्हर्जन प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटातील एडिट केलेलं काही सीन या चित्रपटात दाखवून ‘वेड’ पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ही मोठी पर्वणी असणार आहे.