Amruta Khanvilkar Upcoming Movie : ‘वाजले की बारा’ आणि ‘चंद्रा’ गाणं म्हटलं की आठवते ती अमृता खानविलकर. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या अमृताचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती.

अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, या संदर्भात अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अमेय वाघ आणि जुई भागवत हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – ‘महानंदा’ चित्रपटातील ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गाणे शांता शेळकेंना कसे सुचले? जाणून घ्या

सध्याची तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचं अनेकदा दिसून येतं. या सोशल मीडियामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याच घटनांना अनुसरुन अमृता आगामी चित्रपट असल्याच्या चर्चा आहेत. ‘Like आणि Subscribe साठी हसणं की फसणं ?’ असं कॅप्शन देत चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा – 59th Maharashtra State Film Awards: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात शिवाजी साटम, आशा पारेख यांचा सन्मान; वाचा विजेत्यांची यादी

चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र कॅप्शन पाहता हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असल्याची शक्यता आहे. पोस्टरमध्ये अमृता, जुई आणि अमेय सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीत दिसणारे चेहरे आणि मागे दिसणाऱ्या चेहऱ्यांवरील हावभाव खूप वेगळे आहेत. या चेहऱ्यांमध्ये काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

या आगामी चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते आहेत तर दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. अमेय, अमृता आणि जुईबरोबरच शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत हे कलाकर देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या १८ ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेही परशुरामी, क्षितिज दाते आणि सुयश टिळक यांनी देखील कमेंट करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अमृता खानविलकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ या रिअ‍ॅलिटी शोची परीक्षक आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून आता चाहत्यांमध्ये या चित्रपटासंबंधित उत्सुकता निर्माण झाली आहे. तिच्या या आगामी चित्रपटासाठी अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.