संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत तब्बल ९०० कोटींचा गल्ला जमावला. हा चित्रपट गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या मुख्य कलाकारांप्रमाणे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांची चर्चा सर्वत्र रंगली होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमयेंनी संदीप रेड्डी वांगाच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात फक्त १० ते १५ मिनिटांचा कॅमिओ केला आहे. त्यांच्या या लहानशा सीनला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. ‘अ‍ॅनिमल’मध्ये उपेंद्र यांनी शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची अर्थात फ्रेडी पाटील ही भूमिका साकारली आहे.

हेही वाचा : वडील रवींद्र महाजनींवरील बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर गश्मीर म्हणाला, “सर्वकाही…”

‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर उपेंद्र लिमयेंनी साकारलेल्या फ्रेडी पाटीलची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यांचे चित्रपटातील एन्ट्रीचे सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अर्थात त्यांच्या या कामाची दखल घेऊन ‘इंडियन फिल्म मेकर्स असोसिएशन ऑफ आंध्र प्रदेश’ यांच्याकडून उपेंद्र लिमयेंचा सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात अभिनेत्याने पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

हेही वाचा : “अनुपम सरांनी मेसेज करून माफी…”, सई ताम्हणकरने सांगितला फिल्मफेअरचा किस्सा; म्हणाली, “रणवीरने…”

उपेंद्र लिमयेंना तिरुपती येथे ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्याची खास झलक त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “‘अ‍ॅनिमल’ तेलगू – तिरुपती येथे आयकॉनिक अभिनेता या पुरस्काराने सन्मान” असं उपेंद्र लिमये यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Upendra Limaye (@upendralimaye)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच उपेंद्र लिमये ‘मडगाव एक्स्प्रेस’ या नव्या बॉलीवूड चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुणाल खेमू करणार आहे.