अभिनेते अशोक सराफ यांनी कला क्षेत्राला दिलेलं योगदान मोठं आहे. अशोक सराफ यांनी आजवर मराठी मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रांत उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. शिवाय हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम करत आपला ठसा उमटवला. अशोक सराफ यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते दादा कोंडके यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यांच्या एका चित्रपटात काम करताना अशोक सराफ खूप घाबरले होते. कोणता होता ‘तो’ चित्रपट आणि काय आहे ‘तो’ किस्सा घ्या जाणून.

हेही वाचा- इर्शाळवाडी गावाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत गिरीश ओक म्हणाले, “आताच्या त्रासापेक्षा नंतरची हळहळ जीवघेणी”

दादा कोंडकेंनी आपलं आत्मचरित्र ‘एकटा जीव’मध्ये या किस्स्याचा उल्लेख आहे. ‘राम राम गंगाराम’ या चित्रपटात अशोक सराफांनी म्हांदू खाटीक आणि दादा कोडंकेंनी गंगारामची मुख्य भूमिका साकारली होती. एका मुस्लमान खाटिकाची भूमिका अशोक सराफ साकारत होते. टीशर्ट लुंगी आणि डोक्यावर टोपी असा त्यांचा लूक होता. या चित्रपटात एक सीन होता त्यात एक पांढरा उंदीर म्हांदू खाटीकाच्या लुंगीत शिरतो. पांढरा उंदीर चावतो असा अशोक सराफांचा गैरसमज होता. त्यामुळे ते घाबरले होते आणि त्यांनी हा सीन करायला नकार दिला होता.

हेही वाचा- “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

त्यानंतर दादा कोंडकेंनी अशोक सराफांना तयार केलं आणि त्यांना सीनची आऊटलाईन समजावून सांगितली. त्यानंतर अशोक सराफांनी तो सीन खूप चांगल्या पद्धतीने शूट केला. दादा कोंडकेंनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. दादांनी लिहिलंय. “उंदीर लुंगीत शिरलेला सीन अशोकने खूप चांगल्या पद्धतीने केला. अगदी अप्रतिम. तेरे मेरे बीच में मध्ये अमजदलासुद्धा हा सीन जमला नव्हता. त्या सीनची अशोकला मी फक्त आऊटलाईन समजावून सांगितली होती. पण त्याने डोळे फाकून चेहऱ्याचे एक्सप्रेशनने छान अभिनय केला.

हेही वाचा- “आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही…”, मणिपूर घटनेवर संतापली अभिज्ञा भावे; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सिनेमात मुख्य भूमिका असूनही दादांना फक्त ३६ सीन होते. तर अशोक सराफांचे ३८ सीन होते. या चित्रपटातील दादांची जुगलबंदी सगळ्यांनाच आवडली होती. त्याकाळी हा चित्रपट चांगलाच गाजला होता.