संगीत नाटक अकादमीचे २०२२ व २०२३ या वर्षासाठीचे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी एकूण ९४ कलाकारांना प्रदान करण्यात आले. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यावेळी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी देशातील कलाकार आपली भारतीय कला आणखी समृद्ध करत राहतील असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा : “महिलांनी एग्ज फ्रीज करावेत”, राम चरणच्या पत्नीने मातृत्वाबद्दल मांडलं मत; उपासना म्हणाली, “स्त्रियांना प्रसूती काळात…”

महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी या कार्यक्रमाला पत्नी निवेदिता यांच्यासह उपस्थिती लावली होती. अशोक सराफ यांचा सन्मान होतानाचा खास व्हिडीओ निवेदिता यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. “खूप खूप अभिमान वाटला अशोकना हा पुरस्कार स्वीकारताना पाहून… आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या जनतेचे ऋणी आहोत.” अशी भावना निवेदिता सराफ यांनी ही पोस्ट शेअर करताना व्यक्त केली आहे.

हेही वाचा : अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुखचा हटके अंदाज, किंग खानचं गुजराती ऐकून सगळेच झाले थक्क! म्हणाला, ‘तबीयत एकदम…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ५० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांना फेब्रुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, तर आता संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.