मालिका असो चित्रपट किंवा नाटक मराठी सिनेविश्वात अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं. मराठीतच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सगळ्या गोष्टी उत्तम सुरू असतानाच त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, या कठीण प्रसंगावर मात करत ते अतिशय जिद्दीने पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले. ‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं.

अतुल परचुरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावत नाटकातील एक अंक सादर केला. सादरीकरण पूर्ण झाल्यावर दुर्धर आजारावर यशस्वीपणे मात करून पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत कमबॅक केल्याने त्यांचा आदरसत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर त्यांच्याबरोबर सुनील बर्वे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर यांसारखे कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

‘झी मराठी’ने याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत याला ‘एका अवलियाची गोष्ट’ असं कॅप्शन दिलं आहे. अतुल परचुरे यावेळी म्हणतात, “बरोबर एक वर्षापूर्वी मी पुन्हा उभा राहू शकेन की नाही? याची मला स्वत:लाही गॅरंटी नव्हती. पण, आज मी इथे आहे तो फक्त तुम्हा सर्वांमुळे…” सन्मान झाल्यावर या कलावंताने रंगमंचाचा डोकं टेकवून आशीर्वाद घेतला.

हेही वाचा : ‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

अतुल परचुरे यांचं मनोगत ऐकून उपस्थित सगळेच कलाकार भावुक झाले होते. यावेळी महेश मांजरेकरांनी परचुरेंना मिठी मारली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील अतुल परचुरे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झी नाट्य गौरव २०२४’ या पुरस्कार सोहळा ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. यावेळी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यात येणार आहे.