‘बाईपण भारी देवा’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटाची निर्मिती करून दिग्दर्शक केदार शिंदे घराघरांत लोकप्रिय झाले. त्यांच्या गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करून जवळपास ९० कोटींचा गल्ला जमावला. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शकाने आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. या सगळ्यात त्यांना त्यांच्या पत्नीने खंबीरपणे साथ दिली.

केदार शिंदे यांच्या पत्नी बेला शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. आज पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शकाने खास पोस्ट शेअर करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आजवर मिळालेल्या यशामध्ये केदार शिंदेना त्यांच्या पत्नीने कशी साथ दिली याबद्दल त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा : अमृता खानविलकरकडून चाहत्यांना नववर्षाचं सरप्राईज! ‘या’ हिंदी सीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका, पाहा पहिली झलक

बायकोबरोबर फोटो शेअर करत ते लिहितात, “हा फोटो exactly उलट हवा होता. कारण, तू पाठीशी खंबीरपणे उभी होतीस म्हणून मी काहीतरी करू शकलो. तुझं माझ्या आयुष्यात येणं ही स्वामी कृपा. चांगल्या वाईट दिवसात, मिळेल ते स्वीकारत गेलीस. माझ्या कला आयुष्यातील चढ-उतार हे तू जास्तच भोगलेस. ५१ वर्षे होतायत पण, तू माझी मैत्रीण, बायको आणि वेळप्रसंगी आई झालीस. खूप काही केलंस, करतेस आणि करशीलच याची खात्री आहे. वाढदिवस शुभेच्छा बेला शिंदे स्वामी कृपेने उत्तम होवो.”

हेही वाचा : Video: आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाला ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती हजेरी, केला होता जबरदस्त डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जत्रा’ चित्रपटादरम्यान केदार शिंदेंवर खूप मोठं कर्ज होतं. यावेळी त्यांनी बायकोचे दागिने विकून चित्रपट बनवला होता. दरम्यान, केदार शिंदेंनी शेअर केलेल्या वाढदिवसाच्या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.