केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या मराठी चित्रपटाने फक्त दोन महिन्यांत तब्बल ७५ कोटींहून अधिक कमाई केली. गेली दोन महिने ‘बाईपण भारी देवा’ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर करत सर्व रसिकप्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

हेही वाता : देवोलीनाच्या आंतरधर्मीय लग्नामुळे नाराज होता भाऊ; रक्षाबंधनला खुलासा करत म्हणाली, “आम्ही दोघेही एकमेकांचा…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब-चौधरी या सहा अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्रींसह फोटो शेअर करत दिग्दर्शक केदार शिंदेंनी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं…! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी सुरु झाली लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात

केदार शिंदे या पोस्टमध्ये लिहितात, “काल बाईपणभारीदेवा सिनेमा प्रदर्शित होऊन २ महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यांत खूप काही मिळालं. तुम्हा रसिकांच्या मनात घर करता आलं यापेक्षा अहो भाग्य ते काय दुसरं? या सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि त्यानंतर चित्रपटगृह तुडुंब भरून वाहतायत. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने घवघवीत यश या सिनेमाला लाभलं. मी या सगळ्याचा एक भाग आहे यापेक्षा आनंद तो काय? अजूनही काही ठिकाणी सिनेमा सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात मंगळागौरीचे फेर धरले जातायत. सहा लक्ष्मींच्या साड्या दागिने याचे ट्रेन्ड सर्वत्र दिसून येतायत. श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद मिळाला. पुढे नवं काम करताना जबाबदारीची जाणीव सतत होत रहाणार. चांगलंच देण्याचा प्रयत्न असेल.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला मिळालं जगातील सुंदर गिफ्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचे मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गजांनी कौतुक केलं आहे. प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक भागांमध्ये बायकांचे मोठे ग्रुप्स चित्रपट पाहायला जात होते आणि शेवटच्या गाण्यावर चित्रपटगृहांमध्ये मंगळागौर खेळत असल्याचे ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.