केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आज ५० व्या दिवशीही ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये दमदार कामगिरी करत आहे. सहा अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तब्बल ७६.०५ कोटींचा गल्ला जमवून मराठी कलाविश्वात नवा रेकॉर्ड केला आहे. ‘बाईपण भारी देवा’ला चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण झाल्याने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “त्यांनी माझी खिल्ली उडवली”, ‘चंद्रमुखी’ चित्रपटाबद्दल मानसी नाईकने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, ” तेव्हा दिग्दर्शक-निर्माते…”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात सुकन्या कुलकर्णी-मोने, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब-चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक भागांमध्ये बायकांचे मोठ-मोठे ग्रुप्स चित्रपट पाहायला जात होते आणि शेवटच्या गाण्यावर चित्रपटगृहांमध्ये मंगळागौर खेळत असल्याचे ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ फेम अभिनेत्रीची ‘ठरलं तर मग’ मालिकेत पुन्हा एन्ट्री, जुई गडकरीने शेअर केला नवीन प्रोमो

सहा बहिणींच्या कथेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल्याने केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते लिहितात, “एखाद्या सिनेमाचे ५० दिवस साजरे होण्याची माझी ही पहिलीच वेळ…या सिनेमाला भरभरून प्रतिसाद रसिकांनी दिला. त्यातही स्त्रियांनी याला एवढं आपलसं मानलं. लक्ष्मीच्या पावलांनी हे पदरात पडलं.” केदार शिंदेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : Video : “खरे संस्कार पुरुषांवर…”, मराठी अभिनेत्याचा लहान मुलगा शिकतोय स्वयंपाक, नेटकरी म्हणाले, “या वयात आम्हाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचे मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. यापूर्वी ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत १०० कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.