दिग्दर्शक केदार शिंदे यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ असे दोन चित्रपट यंदा लागोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला आले. एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून त्यांची लेक सना शिंदेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तसेच ‘बाईपण भारी देवा’साठी तिने सहायक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. १८ ऑक्टोबर १९९८ रोजी मुंबईत सनाचा जन्म झाला. केदार शिंदेंच्या लाडक्या लेकीचा आज २५ वा वाढदिवस आहे.

हेही वाचा : १९८९ च्या ‘हमाल दे धमाल’मधील कॅमिओसाठी अनिल कपूर यांनी किती मानधन घेतलं? जयंत वाडकरांनी केला खुलासा

लेकीला २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. “सना तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… मोठी हो. यशस्वी हो. डोकं जमिनीवर आणि पाय जमिनीच्या आत राहू देत. यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव… हे दिवसही सरतील. श्री स्वामी कृपा सदैव राहो. तेच सांभाळतील तुला.” असं कॅप्शन देत दिग्दर्शकाने ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील सनाचा खास फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : Video: प्रसाद ओक स्वप्नील जोशीला देत होता वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, पण घडलं भलतंच, पाहा व्हिडीओ

‘महाराष्ट्र शाहीर’ या शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटात सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी सनाने सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं.

हेही वाचा : ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका; ‘गोदावरी’चे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी शेअर केली खास पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर केदार शिंदे यांनी नव्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला होता. आज लेकीच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय होत त्यांनी ही खास पोस्ट केली आहे. मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी दिग्दर्शकाने लेकीसाठी शेअर केलेल्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.