‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटातील अभिनेत्रींच्या लूकने विशेष लक्ष वेधलं आहे. तर अभिनेत्री दीपा चौधरीचा या चित्रपटातील लूक कसा ठरवण्यात आला हे आता एका व्हिडीओतून समोर आलं आहे.

या चित्रपटात अंकुश चौधरीची पत्नी अभिनेत्री दीपा चौधरी हिने ‘चारू’ ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर ती मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. याचबरोबर तिच्या लूकनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता तिच्या या लूकमागील काही गुपितं उघड झाली आहेत.

आणखी वाचा : अंकुश चौधरीच्या पत्नीच्या खऱ्या आयुष्यातील पाच बहिणींना पाहिलंत का? फोटो शेअर करत दीपा म्हणाली…

या चित्रपटाची वेशभूषा युगेशा ओंकार हिने केली आहे. तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून दीपा चौधरीसाठी वेशभूषा ठरवताना कोणता विचार केला हे सांगितलं आहे. दीपा चौधरी साकारत असलेल्या चारूच्या स्वभावातील विविध गुण युगेशाला वेशभूषा ठरवताना खूप कामी आले. चारू ही वर्किंग वुमन दाखवली असल्याने तिचे कपडे भडक रंगाचे नकोत असा विचार युगेशाने केला होता. याचबरोबर घरातली बरीचशी जबाबदारी ही तीच सांभाळत असल्याने दीपाला या चित्रपटात कॉलर असलेले कपडे दिले आहे. दीपाला बंद गळ्याचे कपडे देण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे चित्रपटातील चारू कधीही तिच्या आयुष्यातल्या गोष्टी फार कोणाशीही शेअर करत नाही.

हेही वाचा : “फक्त त्याची बायको म्हणूनच नव्हे तर…,” अखेर अंकुश चौधरीची पत्नी दीपाने ‘त्या’ प्रश्नांवर सोडलं मौन; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारूची मानसिकता आणखी स्पष्ट होईल यासाठी युगेशाने दीपाला काही ब्रेसलेट दिले. या चित्रपटात दीपाने परिधान केलेला पर्पल रंगाचं ब्रेसलेट मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा ताण-तणाव दूर ठेवण्यासाठी घालतात. तर दीपाने परिधान केलेलं दुसरं ब्रेसलेट हे पैसे किंवा करिअरशी संबंधित अडचणी दूर व्हाव्यात यासाठी घालतात. अशाप्रकारे या चित्रपटातील चारूची वेशभूषा घडवण्यात आली आहे.