केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ने मराठी प्रेक्षकांची गर्दी बॉक्स ऑफिसकडे पुन्हा एकदा खेचून आणली. विशेषत: महिलांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’चं कथानक सहा बहिणींभोवती फिरतं. नात्यात आलेला दुरावा, काळानुरुप बदललेल्या गोष्टी, स्त्रियांचं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष या सगळ्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत दिग्दर्शक केदार शिंदेंनी समाजातील महिलांसह पुरुषवर्गाला या चित्रपटाच्या माध्यमातून आरसा दाखवण्याचं काम केलं.

हेही वाचा : Video : नव्याकोऱ्या हॉटेलमध्ये कॉमेडीचा तडका! ‘एकदा येऊन तर बघा’चा दमदार टीझर प्रदर्शित, तब्बल १६ विनोदवीर खळखळून हसवणार

दमदार कथानकामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ७६ कोटींहून अधिक गल्ला जमावला होता. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता जवळपास तीन ते साडेतीन महिने उलटून गेल्यावरही या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या अभिनेत्री-लेखिका शिल्पा नवलकरांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : विवेक अग्निहोत्री यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या फोटोमधून करण जोहरला केलं क्रॉप; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या पाथर्डी येथील कार्यक्रमातील एक झलक शिल्पा नवलकरांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आदेश बांदेकर सूत्रसंचालनासाठी रंगमंचाच्या मधोमध उभे असताना समस्त महिला वर्ग ‘बाईपण भारी देवा’चं टायटल गाणं गात असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातील खेळ मांडियेला हे भजन गायलं जातं त्यानंतर कालातरांने महिला वर्गाने ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर ठेका धरला आहे.

हेही वाचा : केदार शिंदेंच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस! ‘तो’ फोटो शेअर करत सनाला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “एकच लक्षात ठेव…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पा नवलकरांनी आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमातील ही खास झलक शेअर करत याला “अभूतपूर्व! ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे.” असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इतर अभिनेत्रींनादेखील टॅग केलं आहे.

shilpa navalkar
शिल्पा नवलकर पोस्ट

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात शिल्पा नवलकर यांच्यासह वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.