छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामधील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. प्रियदर्शिनी व सुबोध भावेचा ‘फुलराणी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट. प्रियदर्शिनीला तिच्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच कलाकार मंडळीही तिचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

दरम्यान प्रियदर्शनीच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही व्यक्ती म्हणजे अभिनेत्री भार्गवी चिरमुले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये घर नसताना प्रियदर्शिनी बऱ्याचदा भार्गवीच्या घरी राहायची. याबाबत प्रियदर्शिनीने स्वतःच खुलासा केला होता. आता भार्गवीने तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “गेली तीन ते चार वर्ष मी तिला…” प्रियदर्शिनी इंदलकरबाबत प्रसाद ओकचं वक्तव्य, ‘फुलराणी’ पाहिल्यानंतर म्हणाला, “तिच्या कामामध्ये…”

‘फुलराणी’च्या प्रीमियरला भार्गवी पोहोचली होती. चित्रपट पाहिल्यानंतर तिला प्रियदर्शिनीचा खूप अभिमान वाटला. भार्गवी म्हणाली, “काही माणसं आपल्याला भेटतात ती आपली होऊन जातात. पुढे जाऊन ती माणसं वेगळ्या वाटेला जातात. तरी त्याचाशी ते बंध तसेच राहतात. त्यांची प्रगती त्याचं यश त्यांची मेहनत पाहून आपल्याला कायम आनंद आणि अभिमान वाटत राहतो. मग ते कायमचे ऋणानुबंध होऊन जातात”.

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“झगामगा आणि प्रियदर्शिनीला पाहा, लवकरच भेट”. भार्गवीने प्रियदर्शिनीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेक्षकांना ‘फुलराणी’ पाहण्याचे आवाहन केलं आहे. तर प्रियदर्शनीने भार्गवीच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. ती म्हणाली, “तुझ्याकडूनच मला कायम प्रेरणा मिळाली आहे. तुझ्यामधीलच उर्जा घेऊन पुढे गेली आहे. तुला प्रीमियर भेटून काय आनंद झाला हे सांगता येणार नाही. खूप धन्यवाद”.