राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. तर आता त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

राहुल देशपांडे यांच्या घरी एका नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. ही नवीन सदस्य म्हणजे त्यांची नवी कोरी आलिशान गाडी. राहुल देशपांडे यांनी नुकतीच नवी कोरी मर्सिडीज खरेदी केली आहे. ही गाडी तब्यात घेतानाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली.

आणखी वाचा : राहुल देशपांडे यांचं नाव वापरून टेलिग्रामवर चाहत्यांची फसवणूक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर शोरूममध्ये जाऊन गाडीचा ताबा मिळवताना दिसत आहेत. तर यावेळी त्यांची मुलगी रेणुकाने गाडीची पूजा केली. तर राहुल देशपांडे यांनी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलं. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं, “आई-बापू, तुम्ही आतापर्यंत कायम माझ्या पाठीशी उभे राहिला आहात. आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे. माझ्या डोळ्यासमोर सगळ्या जुन्या आठवणी आल्या. बापू मला त्यांच्या स्कूटरवर गाण्याच्या क्लासला घेऊन जायचे. आपण चौघेजणं त्या स्कूटररून फिरायला जायचो. आई-बापू, माझ्यावर चांगले संस्कार केल्याबद्दल आणि मला मोठ्यांचा आदर करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद. आज मला, नेहाला आणि रेणुकाला तुम्हाला तुमच्या ड्रीम कारमध्ये बसलेलं पाहून खूप अभिमान वाटत आहे.”

हेही वाचा : राहुल देशपांडे यांनी फिल्मफेअर पुरस्कारावर कोरलं नाव, अभिमान व्यक्त करत पत्नी म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता राहून देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर कमेंट कर त्यांचे चाहते आणि कलाक्षेत्रातील त्यांची मित्रमंडळी त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचं अभिनंदन करत आहेत.