Premium

“दादा-वहिनी…,” ‘वेड’ला IIFA पुरस्कार मिळाल्यावर दीपशिखा देशमुखची खास पोस्ट, जिनिलीयाने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

जिनिलीयाने दिलेल्या उत्तराने आता या देशमुखांच्या दोन जावांमध्ये असलेलं बॉण्डिंग चर्चेत आलं आहे.

deepshikha

‘आयफा – २०२३’ हा पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका वाजलेला दिसला. याचं कारण म्हणजे रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. आता त्यांचे मित्रमंडळी व चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. अशातच रितेश-जिनिलीयाच्या वहिनीने या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा एक खास फोटो शेअर करत अभिनंदन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘वेड’ हा चित्रपट गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकलं, तर त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाने चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी केली. याच कामगिरीबद्दल यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला.

आणखी वाचा : “मी सर्वांना ‘तुम्ही’ पण फक्त आईला ‘तू’ अशी हाक मारतो कारण…” रितेश देशमुखच्या उत्तराने जिंकलं मन

‘वेड’ या चित्रपटाला हा पुरस्कार मिळतात सर्वत्र रितेश-जिनिलीयावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. रितेश-जिनिलीयाची वहिनी दीपशिखा देशमुखने त्या दोघांचा पुरस्कार घेतानाचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “अभिनंदन दादा-वहिनी…” तर यावर दीपशिखाची जाऊ म्हणजेच जिनिलीयानेही खास शब्दात उत्तर दिलं. जिनिलीयाने दीपशिखाची स्टोरी रिपोस्ट करत लिहिलं, “थँक यू हनी!” याचबरोबर हिरव्या रंगाचा एक हार्ट इमोजी दिला.

हेही वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

आता या देशमुखांच्या दोन जावांमध्ये असलेलं बॉण्डिंग चर्चेत आलं आहे. जिनिलीयाने दीपशिखाला दिलेल्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आत्ता पहिल्यांदाच नाही, तर ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल देखील दीपशिखाने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांचं अभिनंदन केलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepshikha deshmukh congratulated riteish and genelia for getting iffa award rnv