scorecardresearch

Premium

“मी ‘धर्मवीर’च्या पुढच्या भागातही…” प्रवीण तरडेंच्या वाढदिवशी प्रसाद ओकची सुचक पोस्ट

या पोस्टमधून प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाचे दिले संकेत दिले आहेत.

pravin tarde, prasad oak, dharmaveer, pravin tarde birthday, pravin tarde birthday post, prasad oak instagram, प्रसाद ओक, धर्मवीर, प्रवीण तरडे, प्रवीण तरडे वाढदिवस
या चित्रपटातील प्रसाद ओकच्या भूमिकेबरोबरच प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचंही तेवढंच कौतुक झालं होतं.

‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांवर आपली छाप पाडणारे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच हिट ठरला. चित्रपटसृष्टी ते अगदी शेतीच्या कामात रमणारे प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे प्रवीण तरडे हे उत्तम दिग्दर्शकही आहेत. त्यांनी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात प्रसाद ओकची मुख्य भूमिका होती. त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील प्रसाद ओकच्या भूमिकेबरोबरच प्रवीण तरडे यांच्या दिग्दर्शनाचंही तेवढंच कौतुक झालं होतं. याच चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत प्रसादने त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

आणखी वाचा- “गेल्या अनेक वर्षांपासून…” प्रवीण तरडेंचा वाढदिवस साजरा केल्यानंतर राजू शेट्टींची खास पोस्ट

आपल्या पोस्टमध्ये प्रसाद ओकने लिहिलं, “प्रिय प्रवीण, वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा…!!! माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी ‘धर्मवीर’च्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुझ्या सर्व कलाकृतींना भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” या पोस्टमधूनच प्रसाद ओकने ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाचे संकेत दिले आहेत.

आणखी वाचा-Video : एरव्ही शेतीमध्ये रमणारे प्रवीण तरडे जीममध्ये करताहेत मेहनत, ‘सरसेनापती हंबीरराव’नंतर नव्या चित्रपटाची तयारी

दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2022 at 14:20 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×