दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष लागलेलं असतं. सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत दिसत आहे. पण त्याच्या जोडीला त्यांनी रिंकूला का घेतलं नाही याचं उत्तर त्यांनी दिलं आहे.

नागराज मंजुळे यांचा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सैराट’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. नागराज मंजुळे त्यांच्या पुढील चित्रपटातही या जोडीला कास्ट करतील असं अनेकांना वाटत होतं. पण या चित्रपटात त्यांनी रिंकू ऐवजी सायली पाटीलला प्रमुख भूमिकेत घेतलं.

आणखी वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

सध्या ते या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यानिमित्त आतापर्यंत त्यांनी अनेक मुलाखती दिल्या. तर एका मुलाखतीत त्यांना या चित्रपटात तुम्ही परश्याबरोबर आर्चीला का घेतलं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, “या चित्रपटात जशा कास्टिंगची गरज होती तशाच कलाकारांची निवड करण्यात आली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

त्यांच्या या एका वाक्यात दिलेल्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं. त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल त्यांच्या चाहत्यांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे. या चित्रपटात आकाश आणि सोनाली बरोबर अभिनेते सयाजी शिंदे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा त्यांचा आगामी चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल.