सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॉईज’ या चित्रपटाच्या भागांना प्रेक्षकांचा खूप चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ या चित्रपटांच्या यशानंतर ‘बॉईज ४’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ चित्रपट २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात सुमंत, पार्थ आणि प्रतिकच्या साथीला आता अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे ही मंडळी देखील पाहायला मिळणार आहेत. पण यामध्ये ओंकार भोजने मात्र झळकणार नाही. यामागच्या कारणाचा खुलासा दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी स्वतः केला आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेचा रेकॉर्डब्रेक टीआरपी; जुई गडकरीसह कलाकारांचा एकच जल्लोष, अभिनेत्री म्हणाली, “छप्पर फाडके…”

हेही वाचा – Video: अविनाश नारकरांच्या ‘या’ डायलॉगने वेधलं सगळ्यांचं लक्ष; पालक अन् मुलांविषयी म्हणाले….

‘मराठी मनोरंजन विश्व’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी ‘बॉईज ४’मध्ये ओंकार भोजने का नाही? यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही त्याच्याबरोबर शूट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या प्रकृतीच्या समस्या खूप होत्या. त्याच्या डोळ्याची खूप मोठी समस्या झाली होती. तसेच त्याच्या पाठीमागच्या नसेची देखील समस्या होती. त्याला पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता.”

हेही वाचा – “…म्हणूनच तुम्ही सिनेसृष्टीमधून बाहेर झालात”; नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “घरी या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे दिग्दर्शक म्हणाले, “‘बॉईज ४’साठी ओंकारबरोबर चर्चा देखील केली होती. पण तो स्वतः म्हणाला की, तुर्तास या चित्रपटासाठी माझं काम थांबवू. मी पुढेच्या चित्रपटाला जॉईन करेन. तो खूप आजारी होता. त्याच्याकडे बाकीची देखील काम होती. त्यामुळे त्याला एक नवीन कमिटमेंट मला द्यायची नव्हती. म्हणून आम्हाला त्याच्यासंदर्भात थोडा विचार करावा लागला. आम्ही पण ओंकारला थांबवलं आणि तोही थांबला. हे आमच्यामध्ये परस्पर ठरवलं. लोकांचा हिरमोड झाला त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण ओंकार हा अजूनही ‘बॉईज’च्या कुटुंबाचा भाग आहे. ओंकार पुढे भविष्यात बॉईजमध्ये असणार आहे.”