Fandry Fame Actress Rajeshwari Kharat Dance Video : जवळपास ११ वर्षांपूर्वी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात हे नवखे कलाकार झळकले होते. या दोघांनी जब्या अन् शालू या भूमिका सिनेमात साकारल्या होत्या. फँड्रीमुळे शालू-जब्या घराघरांत लोकप्रिय झाले.

शालू-जब्याची भूमिका साकारणारे दोन्ही कलाकार आता मोठे झाले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर देखील राजेश्वरी आणि सोमनाथ कायम सक्रिय असतात. राजेश्वरीने नुकत्याच शेअर केलेल्या एका डान्स व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्री संजू राठोडच्या व्हायरल गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

राजेश्वरी खरातने साडी नेसून ट्रेडिशनल लूकमध्ये ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरला आहे. “एक कंबर, तुझी कंबर…” असे या गाण्याचे बोल आहेत. राजेश्वरीचा जबरदस्त डान्स प्रत्येकाच्या पसंतीस उतरला आहे. डान्स व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने इतकं सुंदर गाणं बनवल्याबद्दल संजूचे आभार मानले आहेत.

‘Shaky’ या नवीन गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, या गाण्याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे संजू राठोड जगभरात लोकप्रिय झाला. ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’ या गाण्यांनंतर आता त्याच्या ‘शेकी’ गाण्याचीही सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याच्या या नव्या ‘शेकी’ गाण्यात हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणाऱ्या ईशा मालवीयची प्रमुख अभिनेत्री म्हणून वर्णी लागली आहे. सध्या हे गाणं सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. सामान्य लोकांपासून मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजेश्वरी खरातच्या ( Rajeshwari Kharat ) ‘शेकी’ गाण्यावरील डान्सवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तिच्या व्हिडीओला अवघ्या तासाभरात १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.