Gashmeer Mahajani’s favorite place in Maharashtra: आपल्या आवडत्या कलाकारांच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्याबाबत, पडद्यामागील त्यांचे आयुष्य कसे असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. विविध मार्गांनी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
आता सोशल मीडियावर चाहत्यांना कलाकारांबाबत अधिक गोष्टी जाणून घेणे, सोपे झाले आहे. कलाकारदेखील व्हिडीओ, फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्याशी बोलतात. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देतात. यामुळे चाहते व कलाकार यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
गश्मीर महाजनीचं महाराष्ट्रातील आवडतं ठिकाण कोणतं?
अभिनेता गश्मीर महाजनीदेखील अनेक त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसतो. सोशल मीडियावर तो आस्क गश हा सेशन घेतो. या सेशनमध्ये त्याचे चाहते त्याला नानाविध प्रकारचे प्रश्न विचारतात.
नुकत्याच अभिनेत्याने प्रश्न उत्तरांच्या या सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला महाराष्ट्रातील त्याचे आवडते ठिकाण कोणते, आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्याने कोकण असे उत्तर दिले.

गश्मीरला अनेकदा चाहते त्याच्या कामाबद्दलही प्रश्न विचारताना दिसतात. तो सध्या चित्रपटात का दिसत नाही, तो कधी नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असेही ते विचारतात. गश्मीर चाहत्यांना थोडा संयम ठेवा असे सांगतो. त्याने असेही सांगितले आहे की तो त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरदरम्यान होणार आहे. तसेच, हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपट, हिंदी वेब सीरिज व मालिका यांमुळे मोठा चाहतावर्ग असलेला अभिनेता गश्मीर महाजनी हा सातत्याने चर्चेत असतो.
अभिनयाबरोबरच गश्मीर ‘खतरों के खिलाडी’सारख्या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झाला होता. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमातूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आता अभिनेता काही नवीन प्रोजेक्टवर काम करीत आहे. गश्मीरचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरदेखील तो चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते.
दरम्यान, चाहते आता गश्मीरच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याच्या नवीन चित्रपटाचे नाव काय असणार आणि चित्रपटात कोणते कलाकार असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.