जिनिलीया देशमुख ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिनिलीयाने हिंदीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम करून अभिनयाचा ठसा उमटवला. २०१२मध्ये रितेश देशमुखशी विवाहबंधनात अडकून जिनिलीया देशमुख घराण्याची सून झाली. जिनिलीया व विलासराव देशमुख यांचं नात खूप खास होतं.

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जिनिलीयाने खास पोस्ट शेअर केली आहे. जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश व जिनिलीयाची दोन मुलं त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत.

हेही वाचा>> “थोडीतरी लाज…”, ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

“काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा… प्रत्येक दिवशी तुम्हाला साजरं करतो…,” असं जिनिलीयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> UK मधील रेडिओलाही पडली ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, अंकुश चौधरी पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिनिलीया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. लग्नानंतर जिनिलीयाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटातून जिनिलीयाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात रितेश व जिनिलीया मुख्य भूमिकेत होते.