श्रेयस तळपदे आजारपणानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेश मांजरेकरांच्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’च्या निमित्ताने नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं आहे.

‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या चित्रपटानंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक आगळी वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. वडिलांच्या इच्छेखातर मनाविरुद्ध झालेलं लग्न, पूर्वाश्रमीच्या प्रियकराची आठवण यामुळे एकंदर कुटुंबावर कसा परिणाम होतो. याची अप्रतिम मांडणी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटी श्रेयस-गौरीची ‘ही अनोखी गाठ’ जुळणार का? याचा उलगडा १ मार्चला चित्रपटगृहात होणार आहे.

हेही वाचा : सई ताम्हणकरचा आवडता राजकीय पक्ष कोणता? बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरींचा उल्लेख करत म्हणाली…

चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर सांगतात, “नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयसबरोबर प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. याशिवाय ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलंसं करतील.”

हेही वाचा : रितेश देशमुखच्या वहिनीचा सख्खा भाऊ आहे जॅकी भगनानी, बहीण व भाच्यांबरोबर शेअर केलेत खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटामध्ये दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. श्रेयस तळपदेसह गौरी इंगवले, ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेता ऋषी सक्सेना ( प्रियकर), शरद पोंक्षे ( गौरीचे वडील), सुहास जोशी आदींनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.