scorecardresearch

Premium

“हा ऑस्ट्रेलियाचा हेड…”, भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकार झाले नाराज; सई ताम्हणकर ते अमेय वाघ यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

Cricket World Cup 2023 IND vs AUS Final : भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भावना, पोस्ट शेअर करत म्हणाले…

Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
भारताच्या पराभवानंतर मराठी कलाकारांच्या भावुक पोस्ट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २४१ धावा केल्या होत्या. परंतु, ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडच्या दमदार शतकाच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातील काही आघाडींच्या कलाकारांनी टीम इंडियाच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे. काही कलाकारांनी टिव्ही बंद केले, तर काही जणांनी इन्स्टाग्रामवर भावुक इमोजी शेअर केले आहेत.

Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय
Rohit Sharma angry video in IND vs ENG 3rd test in rajkot
IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
former president jair bolsonaro marathi news, jair bolsonaro latest news in marathi, brazil latest news in marathi
विश्लेषण : ब्राझीलचे माजी अध्यक्ष ‘ट्रम्पभक्त’ जाइर बोल्सोनारो पुन्हा अडचणीत? वर्षभरापूर्वी केलेला बंडाचा प्रयत्न किती भोवणार?

हेही वाचा : “बच्चन साहेबांनी लपून मॅच पाहिली,” फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत “हा ऑस्ट्रेलियाचा हेड (ट्रेव्हिस हेड )आता माझ्या हेडमध्ये जातोय” असं म्हटलं आहे. तसेच प्रिया बापट आणि सई ताम्हणकर यांनी भावुक होत इन्स्टाग्रामवर स्टोरीवर रडण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

priya
प्रिया बापट
sai
सई ताम्हणकर

अभिनेता अमेय वाघने “छोडो यार कालापानी देखो! त्यामध्ये कोणीच नाही हरत अशी पोस्ट शेअर केली आहे.” ‘कालापानी’ ही वेबसीरिज असून त्यामध्ये अमेयने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

abhijeet
अभिजीत केळकर

हेही वाचा : Miss universe 2023 : मिस युनिव्हर्स २०२३ किताब पटकावणारी शेनिस पॅलासिओस नक्की आहे तरी कोण?

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने “काही झालं तरीही आम्ही सदैव टीम इंडियाबरोबर आहोत” अशी पोस्ट शेअर केली आहे.

amey wagh
अमेय वाघ

याशिवाय ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने “चला TV बंद करतेय” अशी पोस्ट शेअर केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs australia live score marathi actors shared emotional note after team india lost final match sva 00

First published on: 19-11-2023 at 22:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×