अभिनेत्री सायली संजीव ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. यानंतर सायलीने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं. सध्या अभिनेत्री ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. सायलीने या चित्रपटात ‘कृतिका’ हे पात्र साकारलं आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या निमित्ताने तिने अलीकडेच लेट्सअप मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी सायलीला तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि भविष्यात कोणत्या माध्यमात काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला.
सायली संजीव यावर म्हणाली, “भविष्यात मला कोणत्याही माध्यमात काम करायला आवडेल. मग ते चित्रपट असो किंवा मालिका…यामध्ये नाटकाचा उल्लेख मी मुद्दाम करत नाहीये. कारण, नाटक या माध्यमाशी मी अजूनही तेवढ्या प्रमाणात जुळवून घेतलेलं नाही. नाटकासाठी खूप वेळ द्यावा लागतो. रंगभूमीवर प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो. एखादी गोष्ट स्वीकारण्यापूर्वी मला तेवढा वेळ मला देता येईल का? अशा अनेक गोष्टींचा मी विचार करते.”
हेही वाचा : सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स, अंतिम परीक्षेत मिळवले ‘एवढे’ गुण
सायली पुढे म्हणाली, “कोणत्याही नाटकाचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना मला माझ्यामुळे अजिबात त्रास होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे मी अजूनही नाटकांमध्ये शिरलेली नाही. हेच माझं नाटक न करण्यामागचं प्रामाणिक कारण आहे. असं मला वाटतं.”
हेही वाचा : राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी खोलीत केलेलं बंद, अभिनेत्रीसमोर ठेवली होती फक्त एकच अट
“चित्रपट व नाटकाशिवाय टेलिव्हिजनचं म्हणाल, तर मला हिंदी-मराठी कोणत्याही प्रकारच्या मालिका करायला आवडतील. माझी काहीच हरकत नसेल. टीव्ही माध्यमामुळे आपण घराघरांत पोहोचतो हे मी कधीच विसरणार नाही. टीव्ही किंवा मालिकेमुळे कलाकारांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत रोज पोहोचता येतं. आता ‘झिम्मा २’मुळे मला पुन्हा एकदा चाहत्यांचं प्रेम अनुभवायला मिळत आहे.” असं सायलीने सांगितलं.