मराठी कलाविश्वात सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. झिम्माच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता दुसऱ्या भागाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात ‘झिम्मा २’मधील ‘मराठी पोरी’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हे गाणं सध्या सर्वत्र ट्रेंड करत आहे.

“मराठी पोरी दुनियेला दाखवती माज…” या गाण्याने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या गाण्यात इंदूच्या ७५ व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. तसेच या गाण्याद्वारे चित्रपटातील प्रत्येक स्त्री पात्राच्या स्वभावाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या गाण्यावर आता सामान्यांपासून ते मराठी कलाविश्वातील कलाकारांपर्यंत सगळेजण व्हिडीओ बनवत आहेत. या गाण्यात सिद्धार्थ चांदेकरसह यामधील सगळ्या अभिनेत्री धमाल करताना दिसत आहेत. याच्या प्रत्यक्ष शूटिंगदरम्यान देखील प्रत्येकाने तेवढाच आनंद घेतल्याचं दिग्दर्शकाने नुकत्याच शेअर केलेल्या BTS व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : झहीर खानची पत्नी अभिनेत्री सागरिका घाटगेने सुरू केला नवीन व्यवसाय! पहिली झलक शेअर करत म्हणाली, “माझी आई…”

‘झिम्मा २’चा दिग्दर्शक हेमंत ढोमेने या गाण्याच्या शूटिंगचा पडद्यामागचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सगळ्या कलाकारांकडून हेमंत डान्सचा सराव करून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चित्रपटातील सगळ्या सात अभिनेत्रींची एकत्र धमाल, डान्सचा आनंद, शूटिंगदरम्यान घडलेल्या गमतीजमती या पडद्यामागच्या व्हिडीओतून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.

हेही वाचा : Video : ट्रॅफिकमध्ये अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मराठी पोरी’ हे गाण्यावर आता नेटकरी भन्नाट रिल्स व्हिडीओ बनवत आहेत. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.