छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज लोकप्रिय झाला आहे. असा हा लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक आता लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा – Video: अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले, “दादा एक…”

नुकत्याच एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी बोलताना पृथ्वीक प्रतापनं त्याच्या आगामी चित्रपटाबाबत सांगितलं. तो म्हणाला की, “हास्यजत्रा आयुष्यभर तुमच्या आणि आमच्यासाठी असणारच आहे. पण याचबरोबर माझा लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ज्याचं नावं ‘डिलिव्हरी बॉय’ असं आहे. या चित्रपटात मी आणि प्रथमेश परब असणार आहे.”

हेही वाचा – “मातीशी जोडलेला एकमेव अभिनेता…”, संतोष जुवेकरची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

पुढे पृथ्वीक म्हणाला की, “या चित्रपटासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. कारण चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण झालं आहे. फक्त डबिंग बाकी आहे. हा चित्रपट कधी प्रेक्षकांसमोर घेऊन येऊ, याची आम्हाला उत्सुकता आहे.”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हास्यजत्रेमधील इतर कलाकारांचे देखील चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. गौरव मोरेचा तर ऑक्टोबरमध्ये जलवा असणार आहे. कारण त्याचे तीन चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिना गौरवसाठी खास असणार आहे. ‘अंकुश’, ‘बॉईज ४’ आणि ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात गौरव झळकणार आहे. ‘बॉईज ४’मध्ये गौरवबरोबर निखिल बने देखील पाहायला मिळणार आहे.