नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. आता लवकरच तो प्रसारित होणार आहे. पण त्यापूर्वी महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक कोण हे उघडं झालं आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळे महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक समोर आला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट लोकप्रिय चेहरा, फेवरेट स्टाइल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली होती. त्यामधील आता महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक समोर आला आहे.

हेही वाचा – Video: अंकिता लोखंडेच्या पतीचा आयशा खानबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अंकिता डोकं नसलेली…”

अभिनेते सयाजी शिंदे हे महाराष्ट्राचे फेवरेट खलनायक ठरले आहेत. त्यांना ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी नामांकन जाहीर झालं होतं. सयाजी यांच्याबरोबर ‘वेड’ चित्रपटातील रविराज कांदे, ‘सुभेदार’ चित्रपटातील दिग्विजय रोहिदास आणि ‘चौक’ चित्रपटातील प्रवीण विठ्ठल तरडे यांना फेवरेट खलनायकासाठी नामांकन मिळालं होतं. यामधील सयाजी शिंदे यांनी बाजी मारली आहे.

यासंदर्भात, अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सयाजी यांनी महाराष्ट्राचा फेवरेट खलनायकाच्या ट्रॉफीसह फोटो शेअर केला आहे आणि लिहिल आहे, “झी टॉकीजच्या संपूर्ण टीमचे आणि मान्यवरांचे मनापासून आभार.”

हेही वाचा – Bigg Boss 17: फिनाले वीकमध्ये पोहोचले मुनव्वर फारुकीसह ‘हे’ चार सदस्य, अंकिता लोखंडे होणार शर्यतीतून बाहेर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सयाजी शिंदे यांच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्व चाहत्यांनी सयाजी यांचं अभिनंदन केलं आहे. “आपलं मत वाया नाय गेलं”, “अभिनंदन सर, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा”, “अभिनंदन सर…रुपेरी पडद्यावरील खलनायक आणि वास्तविक जीवनातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.