मराठीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. प्राजक्ताला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओदेखील ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. योगासनांची प्राजक्ताला प्रचंड आवड आहे. काही मुलाखतींमध्ये तिने याबाबत उल्लेखही केला आहे. आतादेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्राजक्ता योगासन करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करत आहेत.

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

योगा आणि प्राणायम हा प्राजक्ताचा आवडीचा विषय आहे. व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत ती याकडे विशेष लक्ष देते. तिच्या दिवसाची सुरुवातच व्यायामाने होते. योगासनांचे विविध प्रकार ती अगदी परफेक्ट करते. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘बकासन’ हा योग प्रकार करताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं की, “बकासन…याआधीही हे आसन करताना तुम्ही मला पाहिलंय. पण १२ आकडे मोजेपर्यंत आसन करणं आता जमायला लागलं आहे.” या व्हिडीओमध्ये प्राजक्ताची योग करण्यासाठीअसणारी जिद्द, चिकाटी व मेहनत दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीला फक्त पाहण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेली ‘ती’ खास व्यक्ती कोण? अभिनेत्रीनेच पोस्ट शेअर करत केला खुलासा

खूप छान, उत्तम फिटनेस अशा अनेक कमेंट तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केल्या आहेत. योग आणि प्राणायम यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम होते आणि तुम्ही निरोगी राहता हे प्राजक्ता नेहमी सांगते. प्राजक्ता स्वतः या सगळ्या गोष्टी फॉलो करते. योग आणि प्राणायमच तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.