बालकलाकार ते उत्कृष्ट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकाचीही धुरा सांभाळणारे मराठी सिनेसृष्टीतले हरहुन्नरी कलाकार म्हणजेच महेश कोठारे. ९० च्या दशकापासून ते आजतागायत ते वेगवेगळ्या माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. करिअरच्या या वाटचालीमध्ये त्यांना अनेक मित्र भेटले. त्यातलीच महत्त्वाची नावं म्हणजे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर.

जिथे एकत्र काम करणं आलं तिथे गैरसमज, चूक, वादविवाद हे आलेच. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारेंची मैत्री तर आजतागायत सगळ्यांनाच माहित आहे. पण महेश कोठारे यांच्या ‘धुमधडाका’ चित्रपटानंतर त्यांची अशोक सराफ यांच्याशीही चांगली मैत्री झाली होती, पण काही कारणामुळे त्यांच्यात थोडे गैरसमज निर्माण झाले होते. याबद्दल महेश कोठारेंनी नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा… १० वर्षांनी पहिल्यांदाच नेटफ्लिक्समध्ये होणार बदल, काय ते जाणून घ्या

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा महेश कोठारे यांना त्यांच्यात आणि अशोक सराफ यांच्यामध्ये काही बिनसलं होतं का याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा महेश कोठारे म्हणाले, “धुमधडाकानंतर अशोक सराफ माझ्याबरोबर नव्हता. काही चुका माझ्याकडून झाल्या नो डाऊट. मी मान्य करतो. मला असं वाटत होतं की, धुमधडाकाच्या एवढ्या मोठ्या यशानंतर आपण जेव्हा पुढचा प्रोजक्ट करू तेव्हा महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे त्रिकुट पाहिजेच पाहिजे. ते अपेक्षित होतं. पण जेव्हा मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो तेव्हा मला असं वाटायला लागलं की ज्या स्क्रिप्टवर आम्ही काम करतोय, ते पात्र अशोक सराफच्या भूमिकेला न्याय देत नाही आहे.”

महेश कोठारे पुढे म्हणाले, “आपण अशोकला घेऊ असं म्हणतोय. पण उगाच अशोकला घेऊन त्याचा वेळ आपल्याला वाया नाही घालवायचा आणि आम्ही तेव्हा अशोकला त्या चित्रपटातून काढलं. पण ते मी त्याला कळवायला पाहिजे होतं. मी ते न कळवताच काम सुरू केलं आणि तिकडे मी चुकलो. मला नंतर त्याची जाणीव झाली.”

“मग जेव्हा मी ‘शुभमंगल सावधान’ हा विषय करायचा ठरवला तेव्हा माझ्यासमोर अशोक सराफशिवाय दुसरा कोणता कलाकारच डोळ्यासमोर आला नाही. त्यामुळे माझं असं होतं की जिकडे अशोक सराफ पाहिजे तिकडे मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. जसा तो खूप चांगला अभिनेता आहे तसा तो माझा चांगला मित्रपण आहे. अशोकनेपण तेव्हा स्क्रिप्ट वाचली आणि त्याला ती खूप आवडली आणि म्हणून त्याने होकार दिला. ”

हेही वाचा… नुकतेच आई-बाबा झालेले वरुण धवन-नताशा दलाल पहिल्यांदाच दिसले लेकीबरोबर, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महेश कोठारे पुढे म्हणाले, “हा प्रयत्न मी आधीही केला होता. जेव्हा मी ‘खतरनाक’ हा चित्रपट केला होता. खतरनाक चित्रपटाची संकल्पना माझ्याकडे होती. त्यात अशोक सराफ मला हवा होता आणि ती स्क्रिप्ट मी अशोकला वाचायला दिली होती. अशोकला ती आवडली नाही आणि त्याने सांगितलं मला नाही वाटत की मी हे करावं. त्या जागेवर मी जॉनी लिव्हरला घेतलं होतं. तो चित्रपटही सुपरहिट झाला होता. पण नंतर जेव्हा अशोकने ‘शुभमंगल सावधान’चं स्क्रिप्ट ऐकल तेव्हा त्याला इतकी स्क्रिप्ट आवडली की त्याने लगेच होकार दिला.”