Makarand Anaspure on Ayushmann Khurrana: मकरंद अनासपुरे यांनी आजपर्यंत मराठी आणि काही हिंदी चित्रपट आणि नाटक यांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘सरकारनामा’, ‘वजूद’, ‘वास्तव: द रिअॅलिटी’, ‘सावरखेड एक गाव’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘अरे देवा’, ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘जबरदस्त’, ‘अरे देवा’, ‘निशानी डावा अंगठा’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या आणि अशा अनेक चित्रपटांत ते प्रमुख भूमिकांत दिसले.
त्यांच्या भूमिकांनी अनेकदा प्रेक्षकांना रडवले तर अनेकदा खळखळून हसवतानादेखील दिसले. आता मकरंद अनासपुरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आयुष्मान खुरानाला भेटल्यानंतर मकरंद अनासपुरे म्हणाले…
मकरंद अनासपुरे यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता आयुष्मान खुराना दिसत आहे. आयुष्मान खुराना आणि मकरंद अनासपुरे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आयुष्मान सूटमध्ये दिसत आहे. त्याने डोळ्यांवर गॉगल लावला आहे, तर मकरंद अनासपुरे यांनी निळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्यावर जॅकेट घातले आहे.
आता हा फोटो शेअर करताना मकरंद अनासपुरे यांनी खास कॅप्शन दिली आहे. त्यांनी लिहिले, “आयुष्यमान भव:” पुढे त्यांनी आयुष्मानला टॅग करत लिहिले, “आयुष्मानला भेटून आनंद झाला. त्याच्याकडे जितके टॅलेंट आहे, तितकीच त्याच्याकडे नम्रता आहे.”
मकरंद अनासपुरे यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “सर, तुम्हीसुद्धा महान कलाकार आहात, आता तुम्हाला भेटून तो भाग्यवान झाला.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “सुपरस्टार जेव्हा दिग्गजाला भेटतो”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “अगबाबो”, एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान सर”, अशा काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
आयुष्मान खुरानाच्या कामाबद्दल बोलायचे तर विकी डोनर, ड्रिम गर्ल, अंधाधून, बाला, आर्टिकल १५ अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. नुकताच तो थामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
