मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी पती प्रदीप खरेरापासून लवकरच घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानसी व प्रदीपच्या सोशल मीडिया पोस्टचा संबंधही घटस्फोटाशी लावला जात आहे.

प्रदीप खरेराने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रदीप मोबाईलवर हेडफोन्स लावून गाणी ऐकताना दिसत आहे. त्यानंतर गाणी ऐकताना त्याचे डोळे पाणावलेलेही व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओला त्याने “जुदा हो के भी तू मुझमे कही बाकी है” हे इमरान हाशमीच्या चित्रपटातील गाणं दिलं आहे.

“तुम्हालाही कोणतं गाणं ऐकताच रडू कोसळतं का?” असं कॅप्शन प्रदीपने या पोस्टला दिलं आहे. प्रदीपची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत असून यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. प्रदीपच्या या व्हिडीओचा संदर्भ मानसी नाईकशी जोडला जात आहे.

हेही वाचा>> “…तेव्हा मला आईने झाडूने मारलं होतं” प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ किस्सा

हेही वाचा>> “लेखक व गीतकार तुमचेच फेवरेट नसतील तर…” क्षितीज पटवर्धन भडकला, मराठी कलाकारांचाही पाठिंबा, नेमकं घडलं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदीप हा एक बॉक्सर असून तो मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे. मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. सुरुवातीला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, अचानक संसारात वादळ आल्यामुळे अवघ्या दीड वर्षातच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.