अभिनेत्री मानसी नाईकचं खासगी आयुष्य सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं. या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पण मानसी व प्रदीपमधील सोशल मीडिया वॉर संपायचं नाव घेत नाही. प्रदीपने रडतानाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मानसीने एक पोस्ट शेअर करत त्याला अप्रत्यक्षपणे सुनावलं होतं.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, नुकत्याच जन्मलेल्या लेकीचा फोटोही केला शेअर, नाव ठेवलं दुआ

आता प्रदीपने पुन्हा एकदा मानसीच्या या पोस्टला उत्तर देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. “आता एक नाही तर दोन-दोन पोरी भेटल्यात आणि खरं तर रडण्याच्या ओव्हर अ‍ॅक्टिंचे ५० रुपये कापायला पाहिजेत. हा एकीकडे पार्ट्या करतोय आणि रीलमध्ये रडून दाखवतोय. खोटं प्रेम… मीच फुकटची सहानुभूती देऊन टाकते. जिच्या जीवावर खाल्लं, जिचा फुकट वापर केला. कर्माची फळ मिळतातच” असं मानसीने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

प्रदीपला याचा फरक पडत नसल्याचं त्याने म्हटलं आहे. “मी माझं आयुष्य सुधारेन किंवा माझं आयुष्य बिघडेल ही फक्त माझी समस्या आहे. माझ्याबद्दल कोण काय विचार करतं याची मी पर्वा करत नाही.” हा एक रिल व्हिडीओ आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – कधीकाळी एअर होस्टेस म्हणून नोकरी करायची ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, आता करते मालिकांमध्ये काम

प्रदीपचा हा रिल व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्याने मानसीला सुनावलं असल्याचं दिसून येत आहे. मानसी व प्रदीप दोघंही अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका करत आहेत. पण अजूनही प्रदीपने मानसीबाबत खुलपणाने बोलणं टाळलं आहे.