काही महिन्यांपूर्वी अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे त्याच्या आजोबांच्या खूप जवळ होता. आजोबांच्या निधनानंतर आदिनाथने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअरही केली होती. आता पुन्हा एकदा आजोबांबाबत बोलताना आदिनाथ भावुक झाला आहे.

‘प्लॅनेट मराठी’च्या ‘त्यानंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमामध्ये आदिनाथने हजेरी लावली होती. यावेळी आदिनाथने त्याच्या कामाबाबत तसेच खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. यावेळी आदिनाथला त्याच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीविषयी बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी आजोबांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

आणखी वाचा – “शूट करता आलंच नाही आणि…” कुशल बद्रिकेने चित्रीकरणादरम्यानचा ‘तो’ व्हिडीओ केला शेअर, संतोष जुवेकरलाही मारलं कारण…

आदिनाथ म्हणाला, “माझे आजोबा खूप कमाल होते. झोपेमध्येच असताना त्यांचं निधन झालं. शेवटच्या क्षणीही ते त्यांच्या कुटुंबियांबरोबरच होते. वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण या वयातही ते अगदी मस्त राहत होते. त्यांची एक वेगळीच स्टाइल होती. नेहमी मॅच बघणं, टीव्ही बघणं त्यांना आवडायचं. संध्याकाळी त्यांच्या हाती ओल्ड मंकचा एक पॅग असायचा”.

आणखी वाचा – Video: “ही पूर्ण वेळ नशेतच…”, बॉडीगार्डला धडकणाऱ्या निसा देवगणला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “ही काजोलची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आरोग्य विषयकही त्यांची काही अडचण असेल तर ते स्वतःच त्यामधून बाहेर पडायचे. आजोबांचं आणि माझं एक वेगळंच नातं होतं. टीव्हीच्या रिमोटवरुन आमची खूप भांडणं व्हायची. मला एकच खंत आहे की, त्यांच्याबरोबर रिमोटवरुन मी कमी भांडायला हवं होतं. पण आमच्या नात्यामध्ये एक गंमत होती”. आदिनाथचं त्याच्या आजोबांवर किती प्रेम होतं हे त्याच्या बोलण्यामधून दिसून आलं.