दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. त्याने ‘सैराट’ या चित्रपटात ‘परश्या’ ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे तो घराघरात पोहोचला. सध्या आकाश हा एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे.

आकाशने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आकाश हा केदारनाथ यात्रेसाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे. यात तो कानटोपी, स्वेटर अशा लूकमध्ये दिसत आहे. आकाशने केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाच दर्शन घेतल्यानंतर हा फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : दोन सातारकर माने अन् एक चित्रपट, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता व किरण मानेंची एकाच सिनेमात वर्णी

या फोटोला कॅप्शन देताना त्याने ‘हर हर महादेव’ असे म्हटले आहे. त्याच्या या फोटोवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. आकाशच्या या फोटोवर अनेकांनी हर हर महादेव अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : प्रवीण तरडे : ‘देऊळबंद’, ‘धर्मवीर’ ते मुळशीच्या मातीशी नाळ जोडलेला ‘दोस्तांचा दिग्दर्शक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आकाश ठोसर हा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्या लूकचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर आता लवकरच तो ‘बाल शिवाजी’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.