बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांत गर्दी करत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील गाणी ट्रेंडिंग आहेत. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या गाण्यावरील रील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले होते. अनेक सेलिब्रिटींनाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर रील बनवण्याचा व्हिडीओ आवरता आलेला नाही.

हेही वाचा>> ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला झालेली अटक, दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर होणार जामिनावर सुटका

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता अपूर्व रांजणकरनेही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर त्याच्या आईसह रील बनवला आहे. अपूर्वने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्व व त्याची आई अमेरिकेतील रस्त्यावर ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या या रीलवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> बिकिनीतील बोल्ड फोटो शेअर करत मिताली मयेकरची पोस्ट, म्हणाली, “आपली संस्कृती…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. अंकुश चौधरीने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदेंची लेक सनाने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.