मराठीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. जितेंद्र जोशी अभिनयाबरोबरच त्याच्या वैयक्तिक कारणांमुळेही नेहमी चर्चेत असतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर जिंतेंद्रने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूडमध्येही जितेंद्रने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच जितेंद्रचा ‘नाळ २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत जितेंद्रने त्याच्या जन्माबाबतचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “बाबांची इच्छा होती की…”, अजिंक्य देव यांच्या करिअरमुळे झालेले सीमा देव व रमेश देव यांचे वाद; म्हणाले, “त्या दोघांचे…”

अलीकडेच जितेंद्रने राजसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जितेंद्रने त्याच्या आईबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं. जितेंद्र त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. आपल्या नावसमोर नेहमी तो त्याच्या आईचे नाव लावतो. जितेंद्रच्या जन्माच्या वेळी त्याची आई मरणाच्या दारातून परत आली होती. दरम्यान या मुलाखतीत जितेंद्रने त्याच्या जन्मावेळेसची घटना सांगितली आहे.

हेही वाचा- “… तर ते आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतं” रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडीओवर मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली….

जितेंद्र म्हणाला, “मी जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे. आई नसती तर मी आयुष्यात कुठे फेकला गेलो असतो माहिती नाही. माझी आई खूप छान आहे. माझी मैत्रीण आहे ती. ती फक्त १७ वर्षाची होती तेव्हा माझा जन्म झाला. माझ्या आजी आजोबांनी १७ व्या वर्षी माझ्या आईचं लग्न करुन दिलं. जन्माच्या वेळी माझ वजन साडे नऊ पाऊंड होतं. माझ्या जन्माच्यावेळी आई मरता मरता वाचली होती. डॉक्टरांनी आजोबांना विचारलं होतं. मुलगी जगवायची की बाळ. आजोबा म्हणालेले मला माझी मुलगी पाहिजे. नंतर तीही जगली आणि मीसुद्धा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र जोशीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याचा गोदावरी चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता लवकरच त्याचा नाळ चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.