‘हिरकणी’ आणि ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : “…तर शाहरुख खानने VHP आणि बजरंग दलाला १०० कोटी द्यावे”, बॉलीवूड अभिनेत्याचे ‘जवान’ चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य

प्रसाद ओकच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘वडापाव’ असे असून, यामध्ये ‘एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी’ दाखवण्यात येईल असे त्याने पोस्ट शेअर करत म्हटले आहे. ‘वडापाव’चे पहिले पोस्टर मंजिरी ओक, प्रसाद ओक आणि चित्रपटातील अन्य कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पोस्टरच्या बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या “प्रेमाच्या कोटींगला लाख भाव रे… घमघमीत जसा आपला वडापाव रे” या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’मध्ये वंदना गुप्तेंनी नेसलेल्या साड्यांची ‘भारी’ गोष्ट, जाणून घ्या…

‘वडापाव’ चित्रपटात प्रसाद ओकसह गौरी नलावडे, लक्ष्मीकांतचा बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कुणाल करण यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोणबरोबर खास फोटो शेअर करून रणवीर सिंहने मानले चाहत्यांचे आभार, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या आगामी चित्रपटासाठी प्रसाद ओकला मराठी कलाविश्वातून अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता खानविलकर, सुव्रत जोशी, खुशबू तावडे, तितिक्षा तावडे, ऋतुजा बागवे, आरती मोरे, सुबोध भावे या मराठी कलाकारांनी प्रसादने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्याला ‘वडापाव’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.