यंदाच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या यंदा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्याबरोबरच चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या २४ एप्रिल २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्याने मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचे परिपत्रक शेअर केले आहे. त्याबरोबर त्याने त्याला एक हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : ‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकचा गौरव, पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला “एक ब्लॅक लेडी…”

प्रसाद ओकची पोस्ट

“अत्यंत आनंदाची बातमी “

या वर्षीचा…
“मास्टर दीनानाथ मंगेशकर
विशेष पुरस्कार”
मला जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीम चे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे…!!!

अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो…!!!”, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.

आणखी वाचा : यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, आशा भोसले ठरल्या मानकरी; प्रसाद ओक, विद्या बालन यांचाही सन्मान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्रसाद ओक गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. मराठी नाटक, मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्याने काम केले आहे. प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो ‘धर्मवीर २’ चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.