सोशल मीडियाच्या जगात एखाद्यावर पटकन टीका करणं सहज सोपं झालं आहे. त्यामुळे ट्रोलर्स जाळ फोफावलं आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरुच असतं. आजकाल कलाकारांना खूप ट्रोल केलं जात. कलाकार मंडळी आणि ट्रोलिंग हे एक समीकरण जुळलं आहे; जे सातत्याने घडताना दिसत. एखाद्या कलाकाराने चांगली पोस्ट केली तरी त्याला ट्रोल केलं जातं किंवा चुकीची केली तरी त्याला ट्रोल केलं जातं. पण काही कलाकार या ट्रोलर्सना सडेतोड, चोख उत्तर देताना दिसतात.

काही दिवसांपूर्वी ट्रोलिंगला संतापून लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता चिन्मय मांडलेकरने एक मोठा निर्णय घेतला. यापुढे कधीची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असा निर्णय चिन्मयने घेतला. अशातच आता सोशल मीडियावरील या ट्रोलिंगविषयी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – “अत्यंत थर्ड क्लास…”, इन्फ्लुएन्सर्सना ‘अ‍ॅक्टर्स’ समजण्याबाबत प्रसाद ओकने मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी त्याला ट्रोलिंग विषयी विचारलं. तेव्हा तो म्हणाला, “मला काही फरक पडत नाही. ज्यांना उद्योग-धंदे नाहीयेत, ज्यांना कुठल्याच गोष्टीचं काही घेणं-देणं नाहीये किंवा ज्यांना पैसे देऊन बसवलेत असे महाभाग ट्रोल करत असतात. याने कुठल्याही कलाकृतीला फारसा काही फरक पडतो असं मला काही वाटतं नाही. मराठीत तर नाहीच नाही.”

पुढे अभिनेता म्हणाला, “मी व्यावसायिक अभिनेता आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती करून पैसे कमवणं आणि माझ्या कुटुंबाच पोटं भरणं हे माझं काम आहे. मी पूर्णवेळ व्यावसायिक अभिनेता आहे. ज्या क्षेत्रात निश्चित मानधन नाही, पेन्शन नाही. ज्यात अत्यंत विचित्र, अनस्टरटन करिअर आहे. कधीतरी खूप पैसे मिळतील. पण कधीतरी सहा, आठ, दहा, बारा महिने घरी बसावलं लागतं. मी पावणे दोन वर्ष घरी बसलो होतो. पावणे दोन वर्ष माझ्याकडे एकही काम नव्हतं अशी वेळ येऊ शकते. कारण क्षेत्रच भयंकर अनिश्चित आहे. त्याच्यावर अनेक माणसं माझ्या आयुष्यातली जगणार आहेत. त्यातून जगवणं ही माझी जबाबदारी आहे, माझं काम आहे.”

हेही वाचा – Video: ‘सुख कळले’नंतर ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा; रश्मी अनपट, रेशम टिपणीससह झळकणार ‘हे’ कलाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही भान असलेली माणसं आहोत. जबाबदाऱ्या असलेली माणसं आहोत. तू प्रेक्षक आहेस. तुझं मत मान्य करणं, स्वीकारणं माझं कर्तव्य आहे. हा चित्रपट प्रसाद ओकने घाण केला, मान्य आहे. तुला आवडला नसेल. हा चित्रपट प्रसाद ओकने उत्तम केला, धन्यवाद. या नाटकात प्रसाद ओकने अत्यंत वाईट दर्जाचं काम केलं, अशा प्रतिक्रिया मी मान्य करीनच. पण कुठल्याही ट्रोलिंगला आयुष्यात कधी भिणार नाही. भ्यालो नाही. माझा माझ्या कलाकृतीवर, प्रामाणिक प्रेक्षकांवर ठाम विश्वास आहे. जे माझा चित्रपट बघून माझ्या चुका सांगतात, नाटक बघून चुका सांगतात किंवा हास्यजत्रा बघून सांगतात की, ही कमेंट आवडली, ही नाही आवडली. त्यांचा मी अत्यंत आदर करतो, त्यांना सन्मान देतो. त्यांची मत ऐकतो, विचार करतो आणि तसं परिवर्तन माझ्यात करतो. ट्रोलिंग वगैरे काय? कोण आहेत ही माणसं? त्यांचा काही संबंध नाही,” असं स्पष्ट प्रसाद ओक म्हणाला.