पावसाळ्यात अनेक कलाकार शूटिंग आणि वैयक्तिक कामांमधून ब्रेक घेत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईबाहेर जातात. असाच एक मराठमोळा अभिनेता यंदाच्या पावसाळ्यात सह्याद्री डोंगर रांगांमधील विविध गडकिल्ल्यांना भेट देत आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने सह्याद्रीतील भटकंतीचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. हा मराठमोळा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : सुष्मिता सेनने ललित मोदींबरोबरच्या नात्यावर सौडलं मौन; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “माझ्या वैयक्तिक…”

सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांमध्ये मनसोक्त फिरणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आहे. आकाश ठोसर लवकरच ‘बाल शिवाजी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आणि स्वत:ची आवड जपण्यासाठी आकाश सध्या विविध गड-किल्ल्यांना भेट देताना दिसतो. याआधी आकाशचा शितकड्यावर थरारक रॅपलिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता नुकताच त्याने सह्याद्रीत ट्रेकिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “हिंदू आहेस मंदिरात जा”, ‘तारक मेहता’ फेम मुनमुन दत्ता मशिदीत गेल्यामुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “तुला अनफॉलो…”

आकाशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो गाडी चालवून घाट रस्त्याने एका गडावर पोहोचल्याचे दिसते. अभिनेत्याने या गडाचे आणि जागेचे नाव उघड न करता याला “सह्याद्री…” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याला उत्सुकतेने जागेची माहिती विचारली आहे.

गडावर जाण्यासाठी अभिनेता ट्रेक करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच या संपूर्ण ट्रेकमध्ये आकाशला एका श्वानाची साथ लाभली. त्याला आकाशने वाटाड्या असे म्हटले आहे. पुढे या व्हिडीओमध्ये अभिनेता भर पावसात धुक्यामध्ये गडावर जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत आकाशचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : “हसली, रडली अन् शेवटच्या रांगेत बसून…”, रणवीर सिंहने सांगितला बायको दीपिकासह ‘रॉकी और रानी’ पाहतानाचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच अभिनेता ‘बाल शिवाजी’ चित्रपटाच्या माध्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत.