सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. अलीकडेच या दोघांनी त्यांच्या स्पेन, फ्रान्स ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याला चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळत आहे, परंतु दोघांनी शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओवर एका युजरने कमेंट करीत या जोडीवर टीका केली आहे. सिद्धार्थनेही या कमेंटकडे दुर्लक्ष न करता या नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा : “तमिळ सत्तेचे प्रतीक असलेला राजदंड…” सुपरस्टार रजनीकांत यांचे ट्वीट चर्चेत, नव्या संसद भवनासाठी मानले मोदींचे आभार

सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या संपूर्ण ट्रीपचे व्हिडीओ ३६० डिग्री कॅमेऱ्यात शूट केले होते. याचा व्हिडीओ शनिवारी (२७ मे) दोघांनी इन्स्टाग्रावर शेअर केला. यावर दोघांच्या चाहत्यांनी कमेंट करीत त्यांचे भरभरून कौतुक केले, परंतु या व्हिडीओवर एका युजरने प्रतिक्रिया देत या दोघांवर टीका केली आहे. संबंधित युजरने म्हटले की, “अरे वा, जंगली रमीची जाहिरात करून, फॉरेनला फिरायला भेटते… मजा आहे बाबा” या कमेंटकडे दुर्लक्ष न करता सिद्धार्थने “काय करणार भाऊ, तुमच्याइतके मल्टी टॅलेंटेड आम्ही नाही.” असे प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा : ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजची घोषणा; मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर शेअर करीत म्हणाला…

संबंधित नेटकरी एवढ्यावरच न थांबता सिद्धार्थने प्रत्युत्तर दिलेल्या कमेंटवर पुन्हा एकदा अभिनेत्याला प्रश्न विचारला आहे की, “बस का, इतकं सगळं छान करता, कलाकार उत्तम आहात, फक्त काही पैशांसाठी कशाला तरुणांना चुकीची दिशा देता…” या कमेंटवर मात्र सिद्धार्थने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा : IPL 2023 चे विजेतेपद कोणता संघ जिंकेल? उर्वशी रौतेला म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर नेहमीच त्याच्या पोस्टवर आलेल्या अशा कमेंटला थेट उत्तर देत असतो. “अलीकडेच त्याला स्पेनपेक्षा दुबईत स्काय डायव्हिंग करायचे” असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला होता. यालाही प्रत्युत्तर देताना सिद्धार्थने “सॉरी, माझे बजेट कमी होते,” असे रोखठोक उत्तर दिले होते.