भारताचा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत अपघातानंतर गेले अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीवरुन उत्तराखंडला जात असताना भीषण अपघात झाला होता. यानंतर पंतला आयपीएल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागली. दरम्यान, ऋषभचे नाव बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाबरोबर जोडले जाते. त्यामुळे अनेकदा पापाराझी उर्वशीला ऋषभबद्दल प्रश्न विचारताना दिसतात. हेही वाचा : “अधुरा था मैं, अब पुरा हुआ…” कार्तिक-कियाराच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष, ‘सत्यप्रेम की कथा’मधील पहिले गाणे रिलीज अलीकडेच 'आयफा' पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पापाराझींनी उर्वशीला विचारलेल्या प्रश्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत मैदानात कधी परतणार? त्याला आरोग्याबाबत आणि क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी काय शुभेच्छा देणार?" असा प्रश्न पापाराझींनी उर्वशीला केला. यावर उर्वशी म्हणाली, "आपण आयफा पुरस्कार सोहळ्याला आलो आहोत त्यामुळे आपण याविषयी बोलूया क्रिकेटचा विषय सध्या नको." हेही वाचा : “पोस्टरखाली सत्यघटनेवर आधारित लिहून…” ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांचे स्पष्ट मत, म्हणाले… उर्वशीने ऋषभच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले परंतु जेव्हा यंदा आयपीएल कोण जिंकणार असा प्रश्न केला गेला तेव्हा मात्र काहीही विचार न करता उर्वशीने "आयपीएल चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ जिंकला पाहिजे. महेंद्रसिंग धोनी हे यामागील एकमेव कारण आहे", असे उत्तर तिने दिले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. https://www.instagram.com/reel/Csvg7ucuYv3/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, ऋषभ आणि उर्वशीची नावे पहिल्यांदा २०१८ मध्ये एकत्र जोडली गेली होती. त्यावेळी दोघांना एकत्र एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींनी पाहिले होते.