‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती नेहमी चर्चेचा विषय असते. अनेकदा ती ट्रोलही होते. पण त्या ट्रोलर्सना सई सडेतोड उत्तर देते. लवकरच ती आई होणार असून तिच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार आहे.

नुकताच सईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिच्या जवळच्या मैत्रीणी सहभागी झाल्या होत्या. जांभळ्या रंगाचा गाऊन, डोक्यावर फुलांचा सुंदर तिआरा, हातात फुलांची परडी असा खास लूक सईने डोहाळे जेवणासाठी केला होता. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले होते; जे चांगलेच व्हायरल झाले. यातील एका व्हिडीओवर अभिनेत्री क्रांती रेडकरेने कमेंट करून सईला एक सल्ला दिला.

हेही वाचा – महाराष्ट्राला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; निलेश साबळे म्हणाले, “कायमस्वरुपी…”

हेही वाचा – चिरतरुण अभिनेते अशोक शिंदे यांचं डाएट माहितीये? जाणून घ्या

क्रांती सईला सल्ला देत म्हणाली, “झोपून घे बाई भरपूर…तुला आणि येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याला खूप खूप प्रेम…” यावर सई म्हणाली, “प्रत्येक आई हाच सल्ला देत आहे. धन्यवाद, तू दिलेल्या शुभेच्छांसाठी.”

हेही वाचा – “…म्हणून अक्षया देवधरेने थांबवली आहेत स्वतःची कामं”; पती हार्दिक जोशीने सांगितलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं काही मराठी, हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे ती अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. सध्या ती बाळंतपण एन्जॉय करत आहे.