विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेतचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने निवेदिता सराफ यांनी एक खास पोस्ट केली आहे.

निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्या कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अशोक सराफ आणि अनिकेत सराफ यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना निवेदिता यांनी अनिकेतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “…त्यावेळी आम्ही मुलाला बिस्कीट पाण्यात बुडवून खायला दिलं होतं”, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

निवेदिता सराफ यांची पोस्ट

“आज आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे,
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
प्रिय अनिकेत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अपार मेहनत, संवेदनशीलता, विनोदबुद्धी आणि विश्वासाच्या जोरावर तू ज्या पद्धतीने स्वत:च्या पायावर उभा राहिलास, त्याबाबत आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
खूप खूप प्रेम”, असे निवेदिता सराफ यांनी म्हटले आहे.

दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत हा शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात फार रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले.

आणखी वाचा : “दारातून वळून बघितलं तर…” निवेदितावरील प्रेमाची जाणीव कशी झाली?, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिकेतचे शिक्षण हे फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. त्याने युट्युबवर ‘निक सराफ’ या नावाने चॅनल सुरु केले आहे. त्यात तो जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ देखील शेअर करत असतो.